आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:मारेगाव शहरात भरधाव ट्रॅक्टरची डिव्हायडरला धडक, दोन गंभीर

मारेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक विलास तोंडासे वय २८ वर्ष, रमेश किनाके, रा. नरसाळा हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रॅक्टर हा मारेगाव येथून नरसाळ्याकडे जात असताना हा ग्रामीण रुग्णालयाचे निवासस्थाना समोर हा अपघात बुधवार, दि. ८ जून रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.अपघात झाल्याचे दिसताच अॅड. परवेज पठाण, जावेद शेख, चरण खाडे, शब्बीर शेख, रायल सय्यद, इक्बाल शेख, अमोल देवाळकर यांनी लगेच ऑटो रिक्षा बोलून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दोघा जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...