आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:मोहा फाटा परिसरात चाकूच्या धाकावर दूध डेअरीतील रोख हिसकावली, तिघांविरुद्ध गुन्हे

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुध डेअरी चालकाला चाकूचा धाक दाखवून दुकानातील रोख जबरीने हिसकावण्यात आली. ही धक्कादायक घटना शहरातील मोहा फाट्यावर शनिवार, २० ऑगस्टला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. निखिल महाजन (२३) रा. मोहा, यवतमाळ असे तक्रारदार दुध डेअरी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी धीरज मईद (२०), रघु रोकडे (२५) आणि गौरव गजभीये (२४) सर्व रा. अभिनव कॉलनी, संदिप टॉकीज, यवतमाळ अशी त्या तिघांची नावे असून यातील धीरज मईद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील अभिनव कॉलनी येथील निखिल महाजन यांची मोहा फाट्यावर दुध डेअरी आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास दुध डेअरीजवळ तीन तरूण मद्यप्राशन करून वाद करीत होते. अशात ते तिघे दुध डेअरीजवळ येत दुकान बंद असे म्हणत निखिल महाजन यांना शिविगाळ केली. त्यामूळे निखिल याने दुध डेअरी बंदच करत असल्याचे त्या तिघांना सांगितले. दरम्यान त्या तिघांनी पुन्हा त्या ठिकाणी येत काउंटरवरील काचा फोडून नुकसान केले.

दरम्यान लाथाबुक्याने मारहाण करीत महाजन यांना चाकूचा धाक दाखवून काउंटरमधील सात हजाराची रोख जबरीने हिसकावून नेली. घटनेची माहिती निखिल महाजन यांनी शहर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान त्या तिघांचा शोध घेत यातील धीरज मईद याला ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत असून उर्वरीत दोघांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...