आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ ब्रिगेडची मागणी:टाकळी - उमरखेड आंदोलन प्रकरणात जिजाऊ‎ ब्रिगेड जिल्हाध्यक्षासह नागरिकांवरील गुन्हे मागे घ्या‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी - उमरखेड आंदोलन‎ प्रकरणात जिजाऊ ब्रिगेड‎ जिल्हाध्यक्षासह नागरिकांवर‎ लावण्यात आलेले गुन्हे मागे‎ घेण्यात यावे, या मागणीसाठी‎ शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारीला जिजाऊ‎ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी‎ आणि पोलिस अधीक्षक‎ कार्यालयावर धडक देवून निवेदन‎ देण्यात आले.‎ उमरखेड तालुक्यातील टाकळी‎ गावाला गेल्या कित्येक वर्षांपासून‎ जायला रस्ता नाही, गावातील‎ नागरिकांनी अनेक आंदोलन केले.‎

परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही.‎ दि. २३ जानेवारीला उपोषण करणार‎ ही प्रशासनाला कल्पना होती. मात्र‎ तरी सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले.‎ त्यामुळे टाकळीवासीयांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.‎ परंतु राजकीय सूड बुद्धीने जिजाऊ‎ ब्रिग्रेड अध्यक्षा सरोज देशमुख व‎ टाकळीवासीयांवर खोटे गुन्हे‎ दाखल करण्यात आले, ते मागे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेण्यात यावे, याकरिता‎ जिल्हाधिकाऱ्यांसह अपर पोलिस‎ अधीक्षक पीयूष जगताप यांना‎ निवेदन देण्यात आले. यावेळी‎ वैशाली पिसाळकर, शीतल भोयर,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उषा दिवटे, मनीषा काटे (भोसले),‎ प्रतिभा मुळे, स्नेहल रेचे, शीतल‎ तेलंगे, अबोली देशमुख, रेखा‎ फलटनकर, शीतल कुरटकर आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...