आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिबिरात 191 जणांनी केली नेत्रतपासणी; नंदुरकर विद्यालयात नेत्र चिकित्सा शिबिर उत्साहात

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील चैतन्यम् इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स व सत्चिकित्सा प्रसारक मंडळ यांच्या वतीने डॉ. महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या सहकार्याने शुक्रवार, दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. नंदुरकर विद्यालय येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाच्या सभागृहामध्ये चैतन्यम् इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश नैनिकवाल, महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय नागपूरचे तज्ञ डॉ. अरविंद डोंगरवार, आरोग्य अधिकारी डॉ. विजय अग्रवाल, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सी. बी. अग्रवाल, चैतन्यम् इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. कृष्णणा राठोड व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास नंदुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेत्रचिकित्सा शिबिराचे प्रास्ताविक करतांना चैतन्यम् इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश नैनिकवाल यांनी चैतन्यम् इन्स्टिट्यूटच्या आरोग्यदायी व इतर कल्याणकारी व समाजसेवी उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

त्यानंतर डॉ. विजय अग्रवाल यांनी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत, आरोग्य तपासणी करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सी. बी. अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात १९१ रुग्णांनी नेत्रतपासणी केली. त्यापैकी ६५ नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. तर ६० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी चैतन्यम् इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स व सत्चिकित्सा प्रसारक मंडळ, योगेश पवार यांनी परिश्रम घेतले. जिल्हयातील उपस्थित रुग्णांना या तपासणीचा लाभ झाला असे या मनोगत शिबिराचे लाभार्थी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...