आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दि. १ ते ३ मे असा तीन दिवसीय भगवान परशुराम जन्मोत्सव शहरात आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्ताने प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजित फडके, नाक कान घसा तज्ञ डॉ. आदित्य तिवारी यांचे तपासणी शिबिर, प्रा. दीपक देशपांडे, ज्येष्ठ सावरकर भक्त, विचारवंत, व्याख्याते शरद पोंक्षे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि अंतिम दिवशी आमदार मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत, पूजन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.
तीन दिवसीय कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे धनंजय तांबेकर, डॉ. गिरीश जतकर, डॉ. अमोल देशपांडे आणि नुकताच ज्याना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ठ अधिकारी म्हणून पुरस्कृत केले असे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी या मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा शहराच्या विविध मार्गांनी मार्गक्रमण करत महिला विद्यालय येथे विसर्जित झाली.
शोभायात्रेचे विशेष आकर्षण फेटे धारी युवती, महिला, बुलेटस्वार युवक, पारंपारिक वेशभूषेतील पौरोहित्य करणारी मंडळी, आणि हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेले दुचाकीस्वार आणि झांकी. त्यानंतर त्याच ठिकाणी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय महोत्सवामध्ये ज्ञाती बंधू-भगिनी यांची प्रचंड उपस्थिती लाभली. कार्यक्रमाकरिता भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे प्रमुख अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाठक, जिल्हा अध्यक्ष ॲड. शैलेश बल्लाळ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुलभूषण तिवारी, संजय त्रिवेदी, प्रदेश युवा सरचिटणीस राम साकळे, शोभायात्रेचे मुख्य संयोजक मनोज औदार्य, विलास महाजन, ओम तिवारी, शिवराम क्रिश्णन, चंद्रशेखर दुबे, गोविंद शर्मा, प्रदीप शर्मा, श्याम शर्मा, संजीव कुमार जोशी, अजय म्हैसाळकर, दिलीप राखे, अजय सक्रावत, तुषार महाजन, सुधीर देशपांडे, रवी मिश्रा, युवा आघाडीचे परीक्षित शर्मा, आशिष तायडे, श्रेयस भावे, पियूष पारवेकर, सागर कोठेकर, ऋचा त्रिवेदी, ऐश्वर्या देशमुख, पूजा व्यवहारे, गायत्री देशमुख, रेणुका पांगारकर, वैभवी डाऊ, रुद्रेश देवधर, कार्तिक घरोटे, अक्षय देशमुख, महिला आघाडी पदाधिकारी मीनाक्षी देशमुख, माधवी देशपांडे, भारती जानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.