आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:मुंबई पोलिस शहरात; 20 लाखांनी फसवणूक‎ बादशहा ताब्यात‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापूर्वी नोंद असलेल्या‎ मुंबईतील फसवणूक प्रकरणातील‎ एका कस्टम ऑफिसरला मुंबई‎ पोलिसांनी यवतमाळातून ताब्यात‎ घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. ३‎ जानेवारीला शहरातील पोबारू‎ ले-आऊटमध्ये शहर पोलिसांच्या‎ मदतीने मुंबई पोलिसांनी पार पाडली.‎ सय्यद शहबाज अली उर्फ बादशहा‎ असे ताब्यात घेण्यात आलेल्या‎ कस्टम ऑफिसरचे नाव आहे.

‎या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार, मुंबईतील‎ कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात‎ सन २०२१ मध्ये २० लाखाच्या‎ फसवणूक प्रकरणात एक गुन्हा नोंद‎ झाला होता.‎ त्या गुन्ह्यात कस्टम ऑफीस‎ बादशहा याचा सहभाग असल्याचे‎ मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर‎ आले.

त्यावरून मंगळवारी मुंबई‎ पोलिस कस्टम ऑफीस बादशहा‎ याच्या शोधात यवतमाळात दाखल‎ झाले.‎ दरम्यान शहर पोलिसांच्या मदतीने‎ त्यांनी बादशहा याची शोधमोहीम‎ राबवत त्याला शहरातील पोबारू‎ ले-आऊटमधून ताब्यात घेतले.‎ बादशहा हा पूर्वी मुंबईत कार्यरत‎ होता. गेल्या काही महिन्यापूर्वी‎ त्याची नागपूरात बदली झाल्याची‎ माहिती देखील पोलिस सूत्रांकडून‎ देण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...