आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शहरामध्ये लवकरच वार्ड तेथे मुख्याधिकारी उपक्रम राबविणार

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राहणाऱ्या नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी पालिकेच्या कार्यालयात येण्याची गरज पडु नये. नागरिकांच्या समस्या त्यांच्या परिसरातच निकाली काढता याव्या यासाठी लवकरच वार्ड तेथे मुख्याधिकारी हा उपक्रम राबवणार आहे. यावेळी पालिकेच्या विभागप्रमुखांनाही सोबत घेत वार्डातील समस्या त्याच ठिकाणी निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा संकल्प पालिकेचे नवे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलतांना व्यक्त केला.

पालिका मुख्याधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील परिस्थिती जाणुन घेत कामाच्या पद्धतीत काही प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. त्यात पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या छोट्या- छोट्या बऱ्याच समस्या असतात. त्यासाठी त्यांना पालिका कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. त्यांचा हा त्रास कमी व्हावा आणि वार्डामध्ये प्रत्यक्ष भेट देवुन तेथील अडी-अडचणी निकाली काढता याव्या या उद्देशाने आता वार्ड तेथे मुख्याधिकारी उपक्रम राबवणार आहे. यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निवेदन त्याच ठिकाणी स्विकारुन त्या अडचणी तेव्हाच जागेवर निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुख देखील सोबत राहणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातुन पालिका प्रशासन अधीक लोकाभिमुख होण्यास मदत मिळणार असल्याचे मुख्याधिकारी डोल्हारकर म्हणाले.

याशीवाय शहरवासीयांसह जिल्हाभरातील नागरिकांसाठी पर्वणी असलेल्या तारांगणसारख्या महत्वाचा प्रकल्प उद्घाटनानंतर लगेच बंद झाला. येत्या काही दिवसातच तारांगण पुन्हा सुरू करुन ते नागरिकांसाठी खुले करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून रखडुन पडलेल्या नाट्यगृहाचे काम या वर्षाअखेरीस पूर्णत्वास नेवुन नव्या वर्षात सुरवातीलाच त्याचे भव्य-दिव्य उद्घाटन करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात शहरात जास्तीत-जास्त रस्ते आणि नाल्या या काँक्रीटच्या तयार करायच्या यावर भर राहणार आहे. सध्या शहरातील रस्त्याची अवस्था बिकट असुन हे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

संबंधीत परिसराच्या अभियंत्यांवर रस्ते खड्डेमुक्त राहतील याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शहरात सध्या सुरू असलेली किंवा नियमानुसार मंजुर झालेली सर्व कामे आणि चौकांच्या सौदर्यीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत. शहर सौंदर्यीकरणासाठी चौकांच्या सौदर्यीकरणासह इतर आवश्यक कामेही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहर स्वच्छतेच्या कामाची पद्धत बदलणार
शहरात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी प्रथम पालिका कार्यालयात यावे लागते. त्यानंतर ते कामावर जातात. यात बराच वेळ जातो. त्यापेक्षा कर्मचारी थेट कामाच्या ठिकाणी पोहचुन काम करतील. त्यानंतर परत जाताना हजेरी होइल. ज्यांचा परिसर स्वच्छ त्यांनी काम केल्याचे गृहीत धरुन हजेरी लागेल. याशीवाय आनखी बरेच बदल शहर स्वच्छतेच्या कामात करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम लवकरच शहरवासीयांना दिसुन येइल.दादाराव डोल्हारकर, मुख्याधिकारी, नगर पालिका यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...