आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॅन्सी बटण बनवण्याची मशीन आणि कच्चा माल पुरवून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली ८१ महिलांची १६ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी लोहारा पोलिसांत ठाण्यात रविवारी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून संशयित महिला हर्षना विष्णु मुन वय ४० वर्ष रा. भांबराजा हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील चार महिलेच्या माध्यमातून महिलांची साखळी करीत लाखो रुपये लाटले. फसवणूक केल्यामुळे चार महिलांनी कंपनीची एजन्सी देतो, असे आमिष दाखविले. सुरुवातीला प्रत्येकी २० हजार रूपये घेवून त्या बदल्यात फॅन्सी बटण बनवण्याची मशीन आणि कच्चा माल दिला जाईल, असेही सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर जिल्ह्यात ८१ महिलांची साखळी तयार करण्यात आली. या महिलांनाही मशीन आणि काही दिवस कच्च्या मालाचा पुरवठा केला. मात्र, नंतर हळूहळू तो बंद केला. तसेच कामाचे पैसेही दिले नाही.
त्यामुळे या महिलांनी पैश्याची मागणी केली असता, पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामूळे संतापलेल्या महिलांनी प्रथम लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश लोहारा पोलिसांना दिले. त्यावरून रविवारी लोहारा पोलिस ठाण्यात संगीता राजभर रा. सिंचन नगर लोहारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अजीत राठोड रा. बोडोली सातारा याच्यासह एकावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलिसांनी हर्षना मुन हिला ताब्यात घेतले असून तीची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड करीत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.