आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:पहिल्या पाळीत बारा दिवस सोडणार पाणी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रब्बी हंगामातील पिकांसाठी बेंबळा प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा आणि कालव्याच्या वितरण प्रणालीच्या स्थितीनुसार पाणी पुरवठा वितरण प्रस्तावित केले आहे. पहिली पाणी पाळी १४ ते २५ डिसेंबर ह्या बारा दिवसांच्या कालावधीसाठी राहणार आहे. तर ७ ते १८ जानेवारी २०२३, ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी ते ७ मार्च, अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने पाणी वितरण केले जाणार आहे.

बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचा मुख्य कालवा शुन्य ते १०५ किलोमीटरपर्यंत आहे. या मधील बाभुळगाव, कळंब, राळेगांव आणि मारेगाव तालुक्यातील बेंबळा कालव्यात मोठ्या संख्येने लाभक्षेत्रातील लाभधारक आहे. त्यांना रब्बी हंगामातील पेरण्यासाठी पाण्याची आवश्यकता राहते. त्या अनुषंगाने दरवर्षी बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांच्या वतीने पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्यात येते. त्यानुसार यंदा बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी पासून पाणी वितरण केले जाणार आहे. तर २५ डिसेंबर पर्यंत पाणी वितरण केले जाणार आहे.

तद्नंतर पुन्हा ७ ते १८ जानेवारी २०२३, तिसरा दि. ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, आणि चौथा २४ फेब्रुवारी ते ७ मार्च, अशा पद्धतीने पाणी वितरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाणी घ्यायचे असल्यास पाणी मागणी अर्ज राळेगाव, यवतमाळ, कळंब बाभूळगाव उपविभागीय अभियंत्याकडे करावा लागणार आहे. या बाबतची माहिती कार्यालयात तसेच सरपंच, तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...