आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेन, पुस्तक, खेळण्याचे साहित्य घेवून फिरण्याच्या वयातच मुलांच्या हातात तलवारी, कोयते, चाकू, देशी कट्टे अशी जीवघेणी हत्यारे दिसत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, विनयभंग, लैंगिक अत्याचार, जबरी चोरी, अशा अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. आताच पोलिसांसह पालकांनी मुलांचे प्रबोधन न केल्यास दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच कळंब शहरातील अश्वीन उर्फ अब्दुल राऊत या तरुणाची चार अल्पवयीन मुलांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तर दुसऱ्या घटनेत जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीच्या मुसक्या शहरातील अवधुतवाडी पोलिसांनी आवळल्या होत्या.
या टोळीकडून तब्बल ६० हून अधीक मोबाईल हस्तगत केले होते. त्याचबरोबर मारेगाव शहरात शेळ्या चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांमध्ये देखील एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. शहरात संघटीत गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेल्या टोळ्यांमध्ये आपापसात होणारा रक्तरंजित संघर्ष ही बाब यवतमाळ शहरवासीयांसाठी नवीन नाही. मात्र, गेल्या काही वर्षातील बऱ्याच खुनांच्या घटना क्षुल्लक वादातून झाल्या आहेत. विशेष म्हणजे ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलांचा सहभाग असून, त्यातून थेट खूनापर्यंतची मजल पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटनांपासून बोध घेत अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी पालकांना स्वतः पुढाकार घ्यावा लागणार आहे. परिसरात आपली दहशत असावी यासाठी, ''धिंगाणा'' घालणारी, हातात चाकू, तलवारी आणि रिव्हॉल्व्हर सारखी हत्यारे घेवून फिरणारी अल्पवयीनांची टोळकी, महागडी चैनीच्या वस्तू वाहने, याचे आकर्षण, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाणारी मुले वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणामुळे पोलिसांसमोर डोकेदुखी मात्र वाढली आहे.
गुन्हेगारी वृत्ती रोखण्याचे आव्हान आई-वडीलांच्या दुर्लक्षाने त्यांच्यावर योग्य संस्कार घडल्या जात नाही. वाईट संगत, सवयीमुळे मुले वाम मार्गाला लागत आहे. कळत नकळत असो अथवा किरकोळ कारणावरून भांडणे नित्याचेच झाले आहे. मात्र, त्याचे रूपांतर हिंसक भांडणामध्ये होत आहे. काही वेळा अल्पवयीन मुले मोठ्या मुलांसोबत मैत्री करताना दिसतात. त्यांच्याशी झालेली किरकोळ वादातही ते चाकु, तलवारी सारख्या हत्यारांचा वापर केल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. सतत वाढणारी हिंसकता आणि गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पालकांसह पोलिसांसमोर आहे.
महागड्या वस्तू, वाहनेही पुरवतात गल्ली बोळात असलेले ''भाई'' मंडळींचे असलेले पोस्टर्स लावून परिसरात दरारा निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळोवेळी तडीपारी, मोक्का ह्या माध्यमातून केला आहे. त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. खर्रा, सिगारेट आणून देण्याच्या कामानेच ह्याची सुरूवात होते. भाईगिरीची नशा डोक्यात असलेल्यांना हेरून, त्यांना हव्या त्या महागड्या वस्तू, वाहने सराईत गुन्हेगारांकडून पुरविल्या जात आहे. अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल झाल्यास त्यांची रवानगी सुधारगृहात होते. तद्नंतर सुटका होताच त्या मुलांचा पुन्हा-पुन्हा वापर केला जात आहे.
‘धुडगूस'' घालणे प्रतिष्ठेचे गल्लीतील मित्रांमध्ये झालेला वाद, किरकोळ भांडण आदी प्रकारामुळे अल्पवयीन मुलांकडून परिसरात हातात चाकू, तलवारी घेवून दहशत पसरवण्याचे प्रकार वाढले आहे. वाहन, दुकाने, घरे यांची तोडफोड केल्याने त्यांची परिसरात दहशत वाढते. त्यामूळे ''धुडगूस'' करणे हे सध्या वाट चुकलेल्या तरुणांमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. पालकांनी वेळीच लक्ष दिल्यास हे सर्व प्रकार थांबू शकतात. यासाठी दंडुका नव्हे, तर त्यांचे प्रबोधनाची गरज आहे.
आई-वडिलांनी मुलांसोबत वेळ घालवावा
आजच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडील मुलांकडेलहानपणापासूनच दुर्लक्ष करतात. त्यांच्यासोबतसंवाद साधत नाही. त्यामूळे लहान मुले व्यसनासहवाईट संगतीत जात आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगारीक्षेत्रात जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचाप्रयत्न करीत आहे. त्यामूळे आई-वडीलांनीआपल्या मुलांसोबत वेळ घालावा, त्याच्याशी संवादसाधावा आणि त्याला खर्चासाठी देण्यात येणाऱ्या पैशाबाबत विचारपूस करावी. डॉ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.