आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाव शहरातील घटना:चार्जिंग स्टेशनच्या नावाने तरुणाची अकरा लाखांत केली फसवणूक ; अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार्जींग सेंटरच्या नावाने समाज माध्यमावर आलेल्या जाहिरातीवरून एका तरुणाची अकरा लाखाने फसवणूक करण्यात आली. ही घटना महागाव शहरात घडली असून शनिवारी या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर महागाव ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, महागाव शहरातील संदिप गायकवाड या तरुणाने समाज माध्यमावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची जाहिरात पाहीली होती. त्यानूसार संदिप गायकवाड याने मुंबई येथे ०२२४८९०३२५४ वर संपर्क करीत एप्लीकेशन फॉर्म भरण्यासाठी २० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. दरम्यान संदिप गायकवाड या तरुणाची निवड बीपीसीएलईव्हीमध्ये झाल्याचे सांगत वेगवेगळ्या तारखांमध्ये त्याच्याकडून तब्बल १० लाख ६५ हजार रुपयांची ट्रान्सफर करून घेतली.

अश्यातच संदिप गायकवाड याला त्या व्यक्तीवर संशय आल्याने तो थेट बीपीसीएलईव्हीचे कार्यालय बघण्यासाठी मुंबईत गेला. मात्र असे कुठलेही कार्यालय त्याला आढळून आले नाही. त्यामूळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने महागाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. हा प्रकार दि. ३१ मे २ सप्टेंबर दरम्यान घडला होता. याबाबतचा पुढील तपास महागाव पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...