आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:नववर्षात महापुरुषांच्या‎ पुतळ्याची केली स्वच्छता‎

वाशीम‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजीक‎ कार्यात अग्रेसर असलेल्या संकल्प ‎ मल्टिपर्पज फाऊंडेशन, सहयोग ‎ ‎ फाउंडेशन व महिला पतंजली योग ‎ ‎ समितीच्या पुढाकारातून सामाजीक‎ भावना जोपासून नववर्षाच्या पहिल्या ‎दिवशी शहरातील सर्व महापुरुषांचे‎ पुतळे धुवून तसेच स्वच्छता तसेच‎ हारार्पण व अभिवादन करुन आगळ्या‎वेगळ्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत‎ करण्यात आले.‎

या उपक्रमाची सुरुवात छत्रपती‎ शिवाजी महाराज चौकातून करण्यात‎ आली. शिवरायांचा पुतळा पाण्याचे‎ स्वच्छ धुतल्यानंतर परिसराची‎ स्वच्छता करण्यात आली व हारार्पण‎ करण्यात आले. त्यानंतर टिळक‎ बागेतील लोकमान्य बाळ गंगाधर‎ टिळकांचा पुतळा, भारतरत्न डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा,‎ महाराणा प्रताप सिंह यांचे तैलचित्र,‎ वस्ताद लहुजी साळवे यांचे तैलचित्र,‎‎ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे‎ तैलचित्र, स्वातंत्र्यवीर तुकाराम रावजी‎ परळकर यांचा पुतळा, पुण्यश्लोक‎ अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा,‎ ध्रुव महाराज पुतळा, कर्मयोगी संत‎ गाडगेबाबा यांचा पुतळा, नेताजी‎ सुभाषचंद्र बोस यांचे तैलचित्र आदी‎ ठिकाणचे पुतळे व तैलचित्र धुवुन‎ स्वच्छ करण्यात आले.‎ या उपक्रमाचा समारोप क्रांतीसूर्य‎ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती‎ सावित्रीआई फुले यांच्या पुतळा‎ स्वच्छ करून व हारार्पण करून‎ करण्यात आला. या उपक्रमाचे हे‎ चौथे वर्ष होते.‎

बातम्या आणखी आहेत...