आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आकाशवाणीत स्नेहमिलन सोहळा उत्साहात‎

यवतमाळ‎ ‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी कोरोना संक्रमण काळात हा‎ सोहळा संपन्न होऊ शकला नाही. मात्र‎ मंगळवार, दि. १ नोव्हेंबर रोजी आकाशवाणी‎ येथे सायंकाळी स्नेह मिलन सोहळा उत्साहात‎ पार पडला. हे या सोहळ्याचे ५ वे वर्ष होते.‎ आकाशवाणीचे आशिष सातपुते यांच्या‎ संकल्पनेतून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन‎ करण्यात येते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून‎ लोकगीत गायक, लोकशाहीर रमेशबाबु वाघमारे‎ म्हणून लाभले होते. तसेच आकाशवाणीचे केंद्र‎ प्रमुख जयंत मोझरकर, कार्यक्रम अधिकारी‎ रत्नाकर हेडाऊ, सहाय्यक अभियंता प्रकाश‎ आमले, प्रसारण अधिकारी आशिष सातपुते,‎ उद्घोषक मंगला मालवे, प्रमोद बाविस्कर हे‎ प्रामुख्याने हजर होते. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ‎ देऊन स्वागत करण्यात आले.

नंतर‎ फराळोत्सवाच्या या स्नेह मिलन सोहळ्यात‎ चिवडा,लाडू, चकली, शंकरपाळी, जिलेबीचा‎ आस्वाद घेत रमेशबाबु वाघमारे यांनी अभ्यास‎ विषया वर आपल्या लोकशाहीर पध्दतीने‎ कविता सादर केली. तसेच प्रकाश आमले यांनी‎ पण आपल्या स्वरचित कविता सादर केली.‎ सोबत प्रमोद बाविस्कर यांनी पण आपल्या‎ वऱ्हाडी कविता सादर केली. यावेळी‎ आकाशवाणीचे सर्व अधिकारी , नैमित्तिक‎ उद्घोषक, उद्घोषीका, प्रसारण सहाय्यक हजर‎ होते. यात अभियांत्रिकी विभागातून मोहन सिंग‎ राजपूत, रंजित शाहू, संजय सुर्यवंशी,‎ प्रशासकीय विभागातून जगदीश काळे, तुषार‎ कालापाड, देवेश मजेठिया, तसेच नैमित्तिक‎ उद्घोषक उद््घोषिका मृणालिनी दहिकर,‎ शिवानी वानखेडे शाहू, सरीता देशमुख, प्रसारण‎ सहाय्यक विनोद हनवते, निलेश कांबळे,‎ सोनाली धोटे, अंकिता अंतकरी, लीना बोरीकर,‎ सचिन शेंडे, लेखक सुधाकर धोंगडे, दारासिंग‎ चव्हाण, सलाउद्दीन खान, गोकुळ कोसरे‎ उपस्थित होते. स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन‎ आणि आभार आशिष सातपुते यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...