आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार:यवतमाळात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून डॉक्टरला 3 लाखांना लुटले

मारेगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील नवरगाव ता. मारेगाव येथील दवाखाना बंद करून स्कूटीने मारेगाव येथे घरी परतणाऱ्या डॉक्टरला चार चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर अपहरण करून लुटल्याची घटना मारेगावनजीक नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी घडली. पोभास रवींद्रनाथ हाजरा असे लुटण्यात आलेल्या खासगी डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. हाजरा हे नवरगाव येथून सोमवारी सायंकाळी मारेगावकडे स्कुटीने परत असताना करंजी-वणी मार्गावर त्यांना कारने अडवले. त्यानंतर कारमधील तिघे खाली उतरले. एकाने दुचाकी धरली, तर दुसऱ्याने रिव्हॉल्व्हर लावली आणि तिसऱ्याने जीवे मारण्याची धमकी देत त्यांना कारमध्ये बसवले आणि त्यांच्याजवळील रोख २४ हजार, ४५ हजाराचे दागिने घेतले. तसेच धमकी देत २५ लाखांची मागणी केली. डॉक्टरांनी वणी येथील मित्राला तीन लाख रुपये घेवून बोलावले. एका दुकानासमोर कारचा अर्धा काच खाली करुन तीन लाख रुपये चोरट्यांनी घेतले. नंतर डॉ. हाजरा यांना कार खाली उतरवून चोरट्यांनी पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...