आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:जिल्ह्यात कोरोनाबळी संख्येचा विस्फोट; एकाच दिवशी १४ बळी

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलेख वाढताच; दिवसभरात ३८२ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही वाढती मृत्युसंख्या पाहता प्रशासनही त्यापुढे हतबल झाल्याचे दिसत असून त्यातच रविवार दि. २१ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाबळींच्या संखेचा मोठा विस्फोट झाला. या एकाच दिवशी तब्बल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. त्यासोबतच जिल्ह्यात नव्या ३८२ कोरोना पॉझिटिव्ह ची भर पडली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील ७२, ७९, ८०, ४५, ५०, ५८, ८३ वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, पुसद येथील ८५ वर्षीय महिला, महागाव येथील ७८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ४० वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील २६ वर्षीय महिला आणि माहुर (जि. नांदेड) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या ३८२ जणांमध्ये २६७ पुरुष आणि ११५ महिला आहेत.

यात यवतमाळमधील १८४, पुसद ४८, दिग्रस ४७, वणी ३४, उमरखेड़ १७, कळंब १४, महागाव १०, दारव्हा ८, पांढरकवडा ६, नेर ४, घाटंजी ४, झरी २, आर्णी १, मारेगाव १, रालेगाव १ आणि १ इतर शहरातील रुग्ण आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोना तपासणीचे एकूण ५०२० रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३८२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ४६३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०३६ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४५९३ झाली आहे. गेल्या २४ तासात ४३० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २१९९७ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५६० मृत्युची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत २३१९६८ नमुने पाठविले असून यापैकी २२०६०० प्राप्त तर ११३६८ अप्राप्त आहेत. तसेच १९६००७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. दरदिवशी मृत्युची संख्या वाढत चालली आहे.

एका दिवसात एक-दोन मृत्यू होत असतानाच आता हा आकडा एका दिवशी तब्बल १४ मृत्यूंवर जावून पोहचला आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अत्यंत तोकड्या पडत असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. अशा स्थितीत यासंदर्भात कठोर अंमलबजावणी न झाल्यास कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

नगरसेवक राजू केराम यांचा कोरोनामुळे मृत्यू
जिल्ह्यात फोफावत असलेल्या कोरोनाने आता मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. त्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक २७ चे नगर पालिका सदस्य राजू केराम यांचाही कोरोनामुळे मृत्यु झाला. गेल्या वेळी पार पडलेल्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते.

स्मशानातही उरली नाही अंत्यसंकारासाठी जागा
एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे मृत्यू झाले. इतर मृत्यूही मोठ्या संख्येने झाले. त्यामुळे पांढरकवडा मार्गावरच्या हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. अखेर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ओट्यांसोबतच ओट्यांच्या बाजूला खाली काही चिता रचून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्मशानात दिवसभरात सर्वत्र चिता पेटत असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...