आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन‎:बेलोरा येथे मानोली गटातील सर्व शाळांचे‎ विभागीय क्रीडा सामन्याचे थाटात उद्घाटन‎

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि. प. शाळा बेलोरा येथे साखरा‎ केंद्रांतर्गत मानोली गटातील सर्व शाळांचे विभागीय‎ स्तरावरील सामन्याचे आयोजन करण्यात आले.‎ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन‎ समितीचे अध्यक्ष प्रवीण बुर्रेवार, उपाध्यक्ष, प्रियंका‎ यम्बडवार, सरपंच वंदना नगराळे, उपसरपंच‎ मुजम्मील पटेल, जफर काका पटेल, विष्णू मडावी,‎ ज्योत्स्ना धुर्वे, सविता कोवे, लीना भिरकड तसेच‎ उदघाटक म्हणून लाभलेल्या वैद्य मॅडम, वि. अ.शि.‎ बनसोड, डोहळे, गरूडकार, देशमुख यांची‎ उपस्थिती लाभली.

उद्घाटन प्रसंगी हेमांशी उईके व‎ मृणाली धुर्वे यांनी उत्कृष्ट गोंडी नृत्य सादर करून‎ उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.कार्यक्रमा च्या‎ यशस्वितेसाठी साखरा केंद्रातील सर्व शिक्षकांचे‎ सहकार्य लाभले. तसेच बेलोरा येथील सर्व‎ शिक्षकवृंद व गावातील युवा वर्ग यांनी आयोजनात‎ मोलाचे योगदान केले.‎

बातम्या आणखी आहेत...