आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक महोत्सव:कोलाम सांस्कृतिक महोत्सव चित्र रथाचे उद्घाटन ; या कार्यक्रमाची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचावी

पांढरकवडा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांचे कडून आयोजित कोलाम सांस्कृतिक महोत्सव २०२२ या कार्यक्रमाची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचावी या करीता या कार्यालयाकडून चित्र रथाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्ररथाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांच्या हस्ते करण्यात आले. हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी फिरणार असून या चित्र रथावर आदिवासी विकास विभाग प्रकल्प पांढरकवडा कडून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना तसेच या प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृह तसेच आदिवासी विकास विभागाची इत्थंभूत माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यात येत आहे. कोलाम संस्कृतिक महोत्सव कार्यक्रम १८ व १९ जून ला माऊली सेलिब्रेशन हॉल शिबला रोड पांढरकवडा येथे पार पडणार आहे. त्याचा सर्व जनतेने आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...