आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य, शिक्षण, रोजगार व नेतृत्व विकासातून आदिम जमातींना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल असे मत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गो. भा. सोनार यांनी व्यक्त केले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत आदिम जमाती बहुल क्षेत्रातील सूक्ष्म नियोजन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम नुकताच स्टेट बँक चौक, जुने वन विभाग कार्यालय, टिंबर भवन जवळ, धामणगाव रोड, यवतमाळ येथे पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी गो. भा. सोनार तर उद्घाटक म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गोवर्धन म्हाला उपस्थित होते. यावेळी युनिसेक इंडिया प्रकल्प संचालक संजय इंगळे, नेहरु युवा केंद्राचे अनिल ढेंगे, नवी उमेद संस्थेचे अमित कुलकर्णी, शिक्षण व विस्तार अधिकारी अरविंद बोरकर व शहरालगतच्या गावातील कोलम बांधव हजर होते. सदर केंद्राच्या माध्यमातून आदिम जमाती प्रामुख्याने कोलाम जमाती साठी केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे, वन हक्क व पेसा बाबत क्षमता बांधणी करणे, आदिम जमातीच्या पारंपारिक ज्ञानाचे जतन करणे, आरोग्य, शिक्षण, कुपोषण, शेती इत्यादी बाबतचे संशोधन करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. प्रास्ताविक रसूल शेख यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे संचालन तितिक्षा दंभे व आभार प्रदर्शन सुमेध भालेराव यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.