आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अर्थात प्रज्ञा पर्व २०२२ या सत्राचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू, तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते शुक्रवार, दि. ८ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले.
सर्वप्रथम, पूज्य भंतेजी राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते प्रज्ञा पर्वचे उद्घाटन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रज्ञापर्व समिती कार्यकारिणी च्या वतीने राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. भीमराव कांबळे, सुरेखा भीमराव कांबळे व अशोक भालेराव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पूजनिय भदंत धम्मसेवक, भंते कमाल धममो, माताजी धम्मदीना, आनंद भगत, महासभेचे जिल्हा अध्यक्ष, विनोद इंगोले, विशाल धबडगे, मिलिंद हट्टेकर, किशोर मुजमुले, गणेश वाठोरे, अगमे, सुरेश कांबळे प्रज्ञा पर्व समितीचे अध्यक्ष, विठ्ठल खडसे, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, उपाध्यक्ष राजेश ढोले, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, सचिव दीपक भवरे, कोषाध्यक्ष नरेंद्र पाटील सहसचिव आर. पी. गवई जनार्दन गजभिये, संघटक संतोष अंभोरे, सहसंघटक सूरज हाडसे, प्रमोद धुळे, नितीन खाडे कैलास श्रावने इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.