आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासेयो शिबिरात उपस्थित:फुले महाविद्यालयाच्या‎ रासेयो शिबिराचे उद्घाटन‎

राळेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव‎ तालुक्यातील वाढोणा बाजार येथील‎ महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना‎ दत्तक ग्राम चिखली येथे आयोजित सात‎ दिवसीय ग्रामीण विशेष शिबिराचा‎ उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.‎

या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष‎ चिखली ग्रामपंचायतचे सरपंच चरनदास‎ मेश्राम तर उद््घाटक म्हणून शेख‎ लुकमान, प्रमुख पाहुणे म्हणून नरेश‎ कोडापे, सुषमा मेश्राम, सतीश आत्राम,‎ एस. किन्नाके, प्राचार्य जितेंद्र शेंडेकर,‎ मुख्याध्यापिका सीमा वान्द्रस्वार,‎ व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम‎ पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा व‎ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या‎ प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात‎ आले.‎

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन‎ रंदळे, या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे‎ किन्नाके व आत्राम यांनी मार्गदर्शन‎ केले. उद्घाटक शेख लुकमान यांनी‎ शिबिराला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्याना‎ मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ चरनदास मेश्राम यांनी शिबिराला‎ शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या‎ कार्यक्रमाचे संचालन हर्षदा राउत,‎ शिवानी निम्रड तर आभार नूतन मोहूर्ले‎ हिने केले. यावेळी विद्यार्थि व मोठ्या‎ संख्येने गावकरी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...