आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन‎:येडशी ग्रामपंचायतीत वॉटर मशीन‎ एटीएमचे उद्घाटन‎

मंगरुळपीर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथे स्टैंडर्ड‎ चार्टर बँक, पिरॅमल फाउंडेशन व इनवेल हेल्थ‎ सोसायटी दिल्ली यांच्या सीएसआर फंडातून मंजुरात‎ करून व ग्रामपंचायत येडशी यांच्या सहभागातून‎ गावातील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध‎ करून दिले.तसेच त्यामध्ये पावसातील पाणी‎ साठवून रेन हार्वेस्टिंग करून १ लाख लिटर क्षमता‎ असलेले टॅंक तयार करण्यात आले. त्याचबरोबर‎ बोअरवेल रिचार्ज करून देणे तसेच जलसंधारण‎ विषयक कंपनी काम करेल असे कंपनीच्या वतीने‎ सांगण्यात आले.

त्यावेळी कंपनीचे मॅनेजर दिपक‎ कळंकर, प्रशांत पाटील, नितीन शिंदे,सचिन‎ कुलकर्णी, गावातील सरपंचा अशादेवी सहदेव चक्र‎ नारायण यांच्या हस्ते वॉटर एटीएम मशीनचे‎ उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जितेंद्र बारड,‎ राजेंद्र बारड, सहदेव चक्रनारायण, विवेक पाटील‎ बारड, बबनराव चक्रनारायण, बाबुराव गजभार,‎ विनोद चक्रनारायण, किसन खटाळ, संजय गजभार,‎ सचिन चक्रनारायण, हिम्मत पवार, संभाजी बारड,‎ शरद कांबळे, प्रकाश चक्र नारायण तसेच गावातील‎ नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...