आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद तालुक्यातील माळ असोली गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या शरद राठोड या ३२ वर्षीय तरुणाचा दोन लाइनमनच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. १० एप्रिलला सायंकाळी घडली असून या प्रकरणी दोन लाईनमनविरुद्ध पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, पुसद तालुक्यातील माळ आसोली ग्रामपंचायत येथे शरद राठोड हा गावात पाणी सोडण्याचे काम करतो. पाणी पुरवठा मोटर चालू करण्यासाठी गेला असता, मोटर पंप चालू झाला नाही. म्हणून शरद हा धनज- मोहदरी फाट्यावर विद्युत पुरवठा दुरुस्त करण्यासाठी लाइनमन नंदापुरे व दुसरे लाइनमन चंद्रवंशी यांची परमिट घेउन विद्युत पुरवठा बंद असताना फ्यूज टाकते वेळी अचानक विद्युत पुरवठा सुरु झाला. अश्यात शरदला जबर विजेचा शॉक लागल्यामुळे तो विद्युत पोलवरून खाली पडुन गंभीर जखमी झाला.
शरदला गंभीर अवस्थेत पुसद येथील रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथे रेफर केले. नांदेडकडे तात्काळ नेत असताना वाटेतच शरदचा मृत्यू झाला. त्यामुळे उमरखेड येथील शासकीय रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी शरदला मृत घोषित केले. यामुळे लाइनमन नंदापुरे व चंद्रवंशी यांच्या हयगय व निष्काळजीपणा मुळेच शरद याचा मृत्यु झाला असून शरद याच्या मृत्युला लाइनमन चंद्रवंशी व नंदापुरे हेच जबाबदार असल्याची तक्रार मृत शरद यांचे सासरे भिकू चव्हाण यांनी पोफाळी ठाण्यात दिली. यावरून लाइनमन चंद्रवंशी व नंदापुरे यांच्याविरुद्ध कलम ३०४ अ व ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
तीन तास मृतदेह ठाण्यात शवविच्छेदनानंतर मृतदेह पोफाळी पोलिस ठाण्यात तब्बल तीन तास ठेवण्यात आला होता. परंतु महावितरण कंपनीचा एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. यावेळी मोहिनी नाईक आणि रमेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने कुटुंबाची समजवणूक करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.