आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू:पांढरकवडा मार्गावरील वाकी फाट्याजवळील घटना, सहा प्रवाशी जखमी, मृतक रामपूर मध्य प्रदेशातील होता रहिवाशी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून जवळपास सहा प्रवाशी जखमी झाले. ही घटना शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या वाकी फाट्याजवळ गुरूवार दि. १७ मार्च सकाळच्या सुमारास घडली. राकेशसिंग महेश सिंग वय २२ वर्ष रा. रामपूर मध्य प्रदेश असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. शहरातील पांढरकवडा मार्गाने एक ट्रॅव्हल्स प्रवाशी घेवून गुरुवारी सकाळच्या सुमारास वणीकडे निघाली होती. तर यवतमाळकडे ट्रक क्रमांक एमएच-११-सीएच-५५४२ हा येत होता. अशात पांढरकवडा मार्गावर असलेल्या वाकी फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये समोरासमोर जबर धडक बसली. या धडकेत ट्रक चालक राकेशसिंग महेश सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्समधील सहा प्रवाशी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मस्कर, वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करून ट्रक चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मृत ट्रक चालकाच्या कुटुंबीयांना देण्यात आली. वृत्तलिहीपर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...