आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिनगावराजा येथून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात शिर्डी येथून अमरावतीकडे परतणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील पती, पत्नीसह मुलगा जखमी झाला.
ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली. अमरावती जिल्हयातील सुमित गावंडे हे पत्नी प्रियंका व अकरा महिन्यांचा मुलगा वेद यांच्या समवेत शिर्डी येथून ( कार क्रमांक एम.एच.२७ डी.ए. ४१०४) ने अमरावतीकडे परतत असताना गावंडे यांचा गाडीवरील ताबा सुटला व त्यांची कार महामार्गाच्या कठड्यावर जाऊन आदळली. दरम्यान, हा अपघात घडताच कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार मधील तिघे जखमी झाले. अपघातस्थळी महामार्गावरील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावंडे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन त्यांच्यासोबत मेहकरकडे पाठवण्यात आले. अपघातग्रस्त कार ही घटनास्थळीच असून याबाबत पुढील तपास महामार्ग पोलिस उपनिरीक्षक शैलेश पवार करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.