आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरूंनी दोन दुचाकी पेटवल्या:मधुसूदन नगरातील घटना; वाहनधारकांमध्ये भीती, माथेफिरूंचा शोध सुरू

पुसद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मधुसूदन नगरात रविवारी पहाटे ३ ते ३.१५ वाजताच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकीचीवर कपडा टाकून जाळल्या. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीती वाढली असून, पोलिसांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी समोर आली आहे.

शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मधुसूदन नगरात प्रदीप मारोती नरवाडे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी अंगणात नेहमीप्रमाणे मालकीच्या दुचाकी क्रमांक एमएच-२९-एव्ही-२३६३ आणि एक्टिव्हा क्रमांक एमएच-२६-एव्ही-९६९१ दोन्ही उभ्या केल्या होत्या. अशात दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने त्या दुचाकीवर कपडा टाकून पेटवून दिल्या. ही बाब नरवाडे कुटुंबीयांच्या लक्षात येताच दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे नरवाडे परिवाराचे अंदाजे एक लाख रुपयांच्या जवळपास या घटनेमुळे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात माथेफिरूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. रात्रीची गस्त अधिक कडक करून आशा माथेफिरूचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...