आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधान्यास खरेखुरे पात्र गरजूंचा शोध घेण्यासाठी गुरुदेव युवा संघाने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन डोअर टू डोअर सर्वे केला. याची तपशीलवार माहिती पुरवठा अधिकारी कार्यालय,तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवली परंतु, अद्याप त्या निकषांना अमलात आणल्या गेले नाही. आजही गरजूंच्या धान्यावर श्रीमंत डल्ला मारत असल्याने हा प्रकार थांबवून निराधारांना प्राधान्य तर दिव्यांगांना अंत्योदय गटात समाविष्ट करण्याची मागणी संघाने प्रशासनाकडे केली.
गेल्या दोन वर्षांपासून धान्य वाटपाचा इष्टांक कोटा वाढविण्यासाठी गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू होता. याचे फलस्वरूप अन्न पुरवठा विभागाच्या कक्षधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारी २०२२ रोजी शहरासह जिल्ह्याचा इष्टांक कोटा जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यासाठी प्राधान्य गटात ३४ हजार ३०३ तर अंत्योदय गटात ३ हजार २६ नागरिकांचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र ३ हजार २५८ लाभार्थी जिल्ह्यात तर १ हजार १०९ लाभार्थी धान्य उचलत आहे.
जाहीर झालेल्या कोट्यात गुरुदेव युवा संघाकडून पात्र ठरलेल्या दिव्यांग, निराधारांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी गुरुदेव युवा संघानी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनातून केली. या घटकांना यात सामावून न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाऊराव वासनिक, समाधान रंगारी, मंदा मानकर, दुर्गा चव्हाण, लता कावरे आदी उपस्थित होते. निकषात न बसणारे, श्रीमंत व्यक्तीसुद्धा रेशनच्या दुकानात धान्य घेण्यास येतात. त्यांचे निकष कुणीही तपासात नसल्याने खऱ्या गरजूंचे धान्य त्यांच्याच घशात चालले आहे. या प्रकारावर पुरवठा विभागाने लक्ष घालावे, इष्टांकच्या कोट्यात दिव्यांग व निराधारांना समाविष्ट करावे, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.