आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडे‎ निवेदन:"फलकावरील प्रोटोकॉलमध्ये सरपंच,‎ उपसरपंचाच्या नावाचा समावेश करा''‎

महागाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशनच्या कामाच्या‎ उद्घाटन फलकावर पालकमंत्री व‎ आमदारांच्या नावांसह सरपंच,‎ उपसरपंचाच्या नावाचा समावेश‎ करावा, अशी मागणी अखिल भारतीय‎ सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष‎ अश्वजित भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन‎ मिशन योजना राज्यातील प्रत्येक‎ गावांमध्ये राबवली जात असताना या‎ कामाच्या उद्घाटन फलकावरील‎ प्रोटोकॉलमध्ये केवळ पालकमंत्री व‎ स्थानिक आमदारांचे नावे टाकण्यात‎ येत आहे.

परंतु ज्या गावांमध्ये ही‎ योजना राबवण्यात येत आहे. त्या‎ गावातील प्रमुख असणाऱ्या सरपंच व‎ उपसरपंचांची नावे टाकली जात नाही.‎ गावातील जनतेने आपले संवैधानिक‎अधिकार वापरून‎सरपंच व‎उपसरपंचांची‎निवड केलेली‎असताना या‎कामाच्या‎फलकावर‎प्रोटोकॉलमध्ये‎ त्यांची नावे टाकणे आवश्यक‎ असताना असे होताना कुठेही दिसत‎ नाही. त्यामुळे आपण याकडे लक्ष‎ घालून या योजनेच्या कामाच्या‎ उद्घाटन फलकावर प्रोटोकॉलमध्ये‎ सरपंच व उपसरपंचांची नावे समाविष्ट‎ करण्याचे आदेश राज्यातील प्रत्येक‎ जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी‎ अधिकाऱ्यांना देण्यात यावे, अशी‎ मागणी अखिल भारतीय सरपंच‎ परिषदेचे महागाव तालुकाध्यक्ष‎ अश्वजित भगत यांनी मुख्यमंत्री शिंदे‎ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...