आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादा गाड्या सोडल्याचा फायदा:दिवाळीत एसटीला अडीच कोटींचे उत्पन्न; सुट्यांच्या काळात दहा टक्के भाडेवाढ

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाने दिवाळीत प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ केली. शिवाय बसेसच्या फेऱ्या वाढवल्या होत्या. त्यामुळे दिवाळीच्या सात दिवसांत बसेसच्या आठ लाख तेरा हजार ८६५ किलोमीटर प्रवासातून २ कोटी ६३ लाख ४७ हजार ८६५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटी महामंडळाला ही दिवाळी लाभदायी ठरली आहे.एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील तालुके आणि मध्यवर्ती बसस्थानक आगाराचा दिवाळीच्या सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली.

त्यामुळे विभागातून ४५० बसेस द्वारे प्रवासी सेवा देण्यात येत होती. ती आता ४६५ वर पोहोचली आहे. विभागाला प्रवासी वाहतुकीतून दररोज २१ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. ते २४ ऑक्टोबरपासून दररोज चाळीस ते ४५ लाखांच्या घरात पोहोचले आहे.

पुसद आगाराला सर्वाधिक उत्पन्न
२२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पुसद बसस्थानकाला ४० लाख ८५ हजार, यवतमाळ ४० लाख ८१ हजार, वणी २८ लाख १४ हजार, उमरखेड ३२ लाख ७९ हजार, दारव्हा २६ लाख ३२ हजार, पांढरकवडा २९ लाख, नेर १८ लाख, दिग्रस २७ लाख १९ हजार व राळेगाव आगाराला २० लाख ३० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

बातम्या आणखी आहेत...