आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण‎ आहार:कामगार सेवकांच्या मानधनात वाढ करा : अरविंद राठोड‎

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईच्या काळात‎ जिल्हा परिषद शाळेतील पोषण‎ आहार कामगारांना प्रति माह १५००‎ रुपये असा अत्यल्प मानधन‎ शासनाकडून देण्यात येत आहे. मात्र हे‎ मानधन वेळेवर मिळत नसल्याने‎ पोषण आहार कामगारांसमोर घर कसे‎ चालवावे? असा प्रश्न पडत आहे.‎ त्यामुळे जिल्हा परिषद शाळा अंतर्गत‎‎‎‎‎‎ पोषण आहार कामगार सेवकांच्या‎ मानधनात वाढ करून देण्याची मागणी‎ आरंभी येथील सामाजिक कार्यकर्ते‎ अरविंद मेरसिंग राठोड यांनी‎ तहसीलदार सुधाकर राठोड‎ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.‎

ग्रामीण भागात शेती कामात रोज‎ मजुरी करणाऱ्या कामगारांना‎ जवळपास ३०० रुपयांवर मजुरी‎ देण्यात येते. मात्र पोषण आहार‎ कामगारांना ५० रुपये रोज प्रमाणे‎ महिन्याकाठी १५०० रुपये मानधन‎ दिल्या जात आहे. त्यामुळे १५०० रुपये‎ मानधनाऐवजी पोषण आहार‎ कामगारांना प्रति माह ५ हजार ते १०‎ हजार रुपये वेतन वाढ करून‎ कामगारांना त्यांच्या हक्काचा मानधन‎ देऊन सदर पोषण आहार कामगारांना‎ न्याय देण्याची मागणी सामाजिक‎ कार्यकर्ते अरविंद राठोड यांनी‎ निवेदनातून केली आहे. यावेळी अन्य‎ नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...