आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:यवतमाळच्या महिला शेतकरी इंदिरा कांबळे यांचा अकोल्यात झाला गौरव; मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे मंगळवार, दि. २९ मार्च रोजी झालेल्या महिला मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्क महिला शेतकरी इंदिरा कांबळे यांना शेती पूरक अळंबी लागवड व्यवसाय या कामानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.

कांबळे या यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील कोल्ही या गावात राहतात. अकोला येथील कार्यक्रमात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री तथा अकोलाचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, जिल्हाधिकारी निमा अरोरा, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते,असे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. यु. नेमाडे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...