आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रोटरी क्लबच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच चिंतामणी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात पार पडला. गजेंद्र निकम यांनी अध्यक्षपदाची तर अभियंता स्वप्निल चिंतामणी यांनी सचिवपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला राजेश गढीकर प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शब्बीर शाकीर होते.
मावळते अध्यक्ष डॉ. जयानंद वाढवे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अभियंता गजेंद्र निकम यांना कार्यभार सोपवला. तसेच मावळते सचिव डॉ. विश्वास डांगे यांनी कार्यकाळातील कार्याची माहिती दिली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सदस्यांना प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरवण्यात आले. अभियंता निकम यांनी यावेळी नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टरची घोषणा केली. प्रा. स्वाती वाठ यांनी महिला सदस्य म्हणून रोटरी परिवारात प्रवेश केला. पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचलन प्राचार्य सुधाकर ठाकरे आणि प्रा. डॉ. चंद्रशेखर खेडकर यांनी केले. तर चिंतामणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला गिरीश बयास, डॉ. सतीश चिददरवार, डॉ. वीरेन पापळकर, डॉ. राजेश चव्हाण, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. उत्तम खंबाळकर, डॉ. भानुप्रकाश कदम, विजय ठाकरे, अन्वर अली, वैभव बजाज, डॉ. तुषार पवार, ॲड. विवेक टेहरे, डॉ.अमोल खांदवे, अमोल वर्मा, डॉ. आनंद कोमावार, डॉ. सुजित चिलकर तसेच इतर आमंत्रित व महिला उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.