आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सखोल चौकशी करा:बंदिस्त नालीचे निकृष्ट बांधकाम; बीडीओंकडे तक्रार, गायमुखनगर ग्राम पंचायतमध्ये खळबळ

पुसद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला लागून असलेल्या गाय मुख नगर ग्रामपंचायत मधील मधुकर नगर येथे १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत बंदीस्त सिमेंट नाली बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले. या बांधकामांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अभियंता, व ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सदस्य मारोतराव कांबळे यांच्या वतीने पुसद पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांच्याकडे नुकतीच करण्यात आली आहे.

पुसद शहराला लागून असलेल्या गाय मुख नगर ग्रामपंचायतीमधील मधुकर नगर येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतः सरपंचाच्या घरासमोरील बंदिस्त नाली अंदाजे रक्कम ३ लाख ४६ हजार तसेच अंगणवाडी सेविका यांच्या घरासमोर नालीचे बांधकाम अंदाजे रक्कम २ लाख, तसेच वार्ड क्रमांक पाच मधील मारोतराव कांबळे यांच्या घराच्या मागील बाजूला बंदिस्त सिमेंट नाली अंदाजे रक्कम ५ लाख रुपयाचे बांधकाम करण्यात आले. परंतू ह्या बंदिस्त नालीचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता सोबत संगनमत करून बंदिस्त नाली बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले. यामध्ये डस्ट, नाममात्र सिमेंट, कही माती मिश्रीत नाल्यांची रेती, शिट्टीचा वापर करण्यात आला आहे. सदर बांधकाम सुरू असतांना बंदिस्त नालीचे काही ठिकाणी बांधकाम फुटले आहे.

या नाली बांधकामात नालीतील बेड मुरूम भरून आणि सिमेंट दगडाचा कमी वापर केला आहे. तर नालीची खोली आणि रुंदी देखील कमी करण्यात आली आहे. तर टक्केवारीमुळे या विकासाच्या कामाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंता कत्राटदार, सचिव, व काही लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संगनमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतः च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाची एमबी, सिसी, बोगस कामाचे बिले काढण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या बंदिस्त नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून इस्टिमेटनुसार काम करण्यात आली नसल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी. आणि कायदेशीर कारवाई व्हावी. कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या कामाचे देयक काढण्यात येऊ नये, अशी तक्रार देण्यात आली होती.

परंतु जर या कामाचे देयक काढण्यात आले तर मला लोकशाही मार्गाने उपोषणास बसावे लागेल याची नोंद घ्यावी, अशा आशयाची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य मारोतराव कांबळे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.जेणेकरून गावातील बंदिस्त नालीच्या निकृष्ट बांधकामात होत असलेला भ्रष्टाचार थांबेल अन्यथा गावात केलेल्या सर्व विकास कामाची चौकशी करावी गावातील नागरिकांना न्याय द्यावा अशा आशयाची तक्रार केली आहे.

बातम्या आणखी आहेत...