आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइपलाइन:राऊतवाडी येथील पाइपलाइन निकृष्ट ; कामाची तात्काळ चौकशी करावी

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत हिवरा अंतर्गत येत असलेल्या राऊतवाडी येथे येथील जल जीवन योजनेअंतर्गत पाइपलाइनचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे चार लाख रुपयाच्या असून एका पुसदच्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. मात्र पाइपलाइनचे काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत असल्याचे राऊतवाडी येथील जनतेला पिण्याचे पाणी मिळेल की नाही हे सांगता येणार नसले तरी या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे जनतेला स्वस्त पाणी मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकही गाव पाण्यापासून वंचित राहू नये, जल जीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळ जोडण्याची कामेही मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. परंतू हिवरा गटग्रामपंचायत असलेल्या राऊतवाडी येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेतून ग्रामपंचायत अंतर्गत चार लाख रुपयांचा पाइपलाइन टाकण्याकरता निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरचे काम पुसद येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले असून नालीची रुंदी व खोली कमी करून अंदाजपत्रकानुसार पाइप टाकण्यात येत नाही. दोन दिवस आधी पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यात आले असून रहदारीमुळे निकृष्ट करण्यात आलेले काम जागोजागी पाइप फुटल्याने त्यामुळे ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. संबंधित ग्रामसेवक याने या कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेल्यामुळे अजूनही राऊत वाडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी संदीप पांडुरंग बोडके, अंकुश बोडके व समस्त गावकरी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...