आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर बाहेर आपले खाजगी दवाखाने चालवीत आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी तसेच मंजुर असलेले ग्रामीण रुग्णालय तत्काळ सुरू करा अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महागाव तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असुन आपत्कालीन प्रसंगी उपचार मिळत नसल्याने या भागातील रुग्ण यवतमाळ, पुसद रुग्णालया पर्यंत पोहोचण्याच्या आगोदरच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महागांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चालु असून याठिकाणी रात्री बेरात्री एकही डॉक्टर हजर नसतो. त्यामुळे काही दिवसा आगोदर एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या पायरीवर झाली होती. पुसद किंवा यवतमाळ शिवाय रुग्णांना पर्याय नसतो, तो रुग्ण तिथपर्यंत पोहचण्या आगोदरच दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. बऱ्याच मातांचे प्रसूती पुर्वीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.नुकताच बालमाता मृत्यु फुल सावंगी व काळी येथे झाला आहे. ग्रामिण रुग्णालयाची नविन इमारत ३ ते ४ वर्षापासून तयार आहे. पण सुरु का होत नाही. याचे कारण अजुनही कळत नाही.ग्रामीण रुग्णालये तातडीने सुरू केल्यास गरिबांसाठी ते जीवरक्षक ठरतील आत्महत्याग्रस्त महागाव तालुक्यात अनेकवेळा विष प्राशन केलेले रुग्ण प्राथमिक केंद्रात डॉक्टर हजर नसल्यामुळे दगावले आहेत. अशा लोकांना पुसद, यवतमाळ शिवाय पर्याय नसतो तोपर्यंत तो रुग्ण गतप्राण होतो.त्यामुळे कायम स्वरुपी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी.
तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे खाजगी दवाखाने चालु आहेत. ते बंद करण्यात यावे. जेणे करुन रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचार होवुन त्याला जीवदान मिळेल. सर्व डॉक्टर व कर्मचारी हे आपल्या मुख्यालयी मुक्कामी राहतील याची खबरदारी घेवून त्यांना सुचना कराव्यात.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खेड्यापाड्यातील साथीच्या रोगांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर हजर नसल्याने ते सर्व रुग्ण खाजगी डॉक्टरकडे जात आहेत त्यामुळे ग्रामीण रुग्णालय त्वरीत सुरू करण्यात यावे अन्यथा १५ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना सोबत घेवुन उपोषण करण्याचा इशारा जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.