आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्य हैराण:होळी सणाला महागाईची झळ;‎ घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महाग‎

यवतमाळ‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या वाढत जाणाऱ्या महागाईने‎ सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.‎ त्यात १ मार्चपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या‎ दरात वाढ झाल्याने महागाईचा आणखी‎ भडका उडाला आहे. अगोदरच गृहिणींना‎ घराचे नियोजन करताना अडचणी येत‎ असून गॅसच्या दरवाढीमुळे घराचे बजेट‎ कोलमडले आहे. मागील वर्षात घरगुती‎ गॅसच्या दरात २०३ रुपयांनी वाढ झाली.‎ व्यावसायीक सिलिंडरच्या दरात ३५० रूपये‎ वाढ केली तरी ते मागच्या वर्षांच्या तुलनेत‎ स्वस्तच आहे.‎ घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल,‎ डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत‎ आहे. त्यामुळे सामान्यांना महागाईचे चटके‎ बसत आहेत. दुसरीकडे १०९० रुपयांना‎ मिळणारे घरगुती गॅस सिलिंडरच्या‎ किंमतीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी ५०‎ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे हे सिलिंडर‎ आता ११४० रुपयांना मिळणार आहे. १‎ मार्च २०२२ रोजी घरगुती गॅस सिलिंडर‎ ९०७.५० रुपयात मिळत होते. व्यावसायीक‎ गॅस सिलिंडर २३८८.५० रुपयांना मिळत‎ होते. केंद्र सरकारने दरवाढ केल्यानंतर आता १ मार्च २०२३ रोजी‎ घरगुती गॅस ११४०.५० रुपयात तर‎ व्यावसायीक गॅस सिलिंडर २१६२.५० रुपयात‎ मिळत आहे.

मार्च २०२२ ते १ मार्च २०२३ या‎ वर्षभरात पाचवेळा गॅस दरवाढ झाली.‎ यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर दरात २०३‎ रुपयांनी वाढ झाली. व्यावसायिक गॅस‎ सिलिंडरच्या दरात १२ वेळा चढ-उतार झाले.‎ १ मे रोजी २३८८.५० रुपयांत मिळणार‎ सिलिंडर आता ३५० रुपये वाढ झाल्याने‎ २१६२.५० रुपयांत मिळत आहे. १ नोव्हेंबर‎ २०२२ रोजी सर्वात कमी १७८६ रुपयांना‎ मिळत होता. २ जानेवारी रोजी त्यात २६‎ रुपयांची वाढ झाली, तर १ फेब्रुवारी रोजी‎ पुन्हा १ रुपयाची घट झाली होती. आता १‎ मार्च रोजी थेट ३५० रुपयांची वाढ झाली‎ आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५०‎ रुपयांची वाढ झाली. घरगुती गॅसचे दर‎ सातत्याने वाढत असताना त्यावरील‎ मिळणारी सबसिडी नसल्यासारखीच आहे.‎ वाढत्या महागाईमुळे गृहिणींची घराचे बजेट‎ सांभाळताना दमछाक होत आहे.‎

ऐन महागाईतच झाली दरवाढ : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढवला आहे.१०९०‎ रुपयांना मिळत असलेले सिलिंडर आता ११४० रुपयांना मिळणार आहे.महागाईने ग्रासलेले असताना गॅस दरवाढीने गृहिणींची चिंता‎ वाढणार आहे.गेल्या दोन वर्षांत अन्नधान्यासह इतर वस्तूंच्या किमती कैक पटीने वाढल्या आहेत.त्यामुळे आधीच हैराण असलेल्या‎ मध्यम व गरीब कुटुंबांना आर्थिक पेचात टाकले आहे.‎

सिलिंडरचे नवीन दर लागू‎
केंद्र सरकारने गॅसच्या दरात वाढ केली‎ आहे,नवीन दर लागू करण्यात आले‎ आहेत.घरगुती सिलिंडर ११४० रुपयांना तर‎ कमर्शियल गॅस सिलिंडर २१६२.५० रुपयांना‎ मिळणार आहे.मागील वर्षभरात घरगुती गॅसचे‎ दर वाढले आहेत, तर व्यावसायिक वापराच्या‎ गॅस सिलिंडरचे दर घटले आहेत असे‎ शहरातील गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले.‎

‘उज्जवला’चा उद्देशच हरवला‎
अनेकांच्या हाताला काम नाही.पेट्रोल,& nbsp;डिझेल,गॅस सिलिंडरच्या किंमतीत‎ नेहमी वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणेकठीण झाले आहे.महिलांना‎ धुरापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे‎ थाटात वाटप केले.मात्र,&nb sp;गॅस दरवाढीमुळे या योजनेच्या लाभार्थी महिला‎ पुन्हा चुलीकडे वळणार आहेत.‎ - सुनीता मेंढे, गृहिणी.‎

आता अनुदानही गायब‎
काँग्रेसच्या काळात गॅस सिलिंडरला‎ अनुदान दिले जात होते.दर कमी‎ असतानाही अनुदान सुरू‎ होते.मात्र,&nb sp;आता सिलिंडरचे‎ अकराशेवर पोहोचले तरीही अनुदान‎ दिले जात नाही.घरगुती सिलिंडरसाठी‎ पन्नास टक्के अनुदान द्यावे.‎ - प्रभा डंभारे,गृहिणी‎

बातम्या आणखी आहेत...