आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर कोसळले आहेत. त्याचा आर्थिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरात घसरण झाल्याने बाजारात येणाऱ्या सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. कापसापाठोपाठच आता सोयाबीनचेही दर घसरले असून, गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे दर ५ हजार २०० रुपये क्विंटल होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, बहुतांश शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन साठवून ठेवले आहे. गेल्या वर्षीचा सोयाबीनचा हंगाम संपताच सोयाबीनची विक्रमी भाववाढ नोंदवली गेलेली होती.
या भाववाढीचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक झाला होता. यंदा सोयाबीनला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घट झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलेले होते. हळूहळू दरात सुधारणा होत गेली. सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांवर पोहोचलेले होते. मात्र, आता दरात घसरण सुरू झालेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात कापसाच्या दरातही मोठी घसरण पाहावयास मिळाली. कापसानंतर आता सोयाबीनचे दरही खाली आलेले आहेत.
मशागतीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही तीन एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरले होते.मात्र ७ पोते झाले.बाजार भाव लक्षात घेता सद्या विकून फायदा नाही.मशागतीसाठ ी जवळपास ५० हजार खर्च झाला.सोयाबीनच् या उत्पादनातून मशागत खर्चही निघाला नाही. - वैष्णव पाथोडे, शेतकरी,
बाजारतील आवक घसरली गेल्या काही दिवसांपासून दरात सुधारणा होत होती. मात्र, दरात घसरण होत असल्याने आवक मंदावली आहे.दर आणखी वाढतील,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.दर वाढल्यास निश्चितच सोयाबीन मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. अजय येंडे, सचिव, बाजार समिती
चार दिवसात झालेली सोयाबीनची आवक दिनांक आवक क्विंटल ३० जानेवारी- ;४३५ ३१ जानेवारी- ;५०२ १ फेब्रुवारी- बाजारतील आवक घसरली गेल्या काही दिवसांपासून दरात सुधारणा होत होती. मात्र, दरात घसरण होत असल्याने आवक मंदावली आहे.दर आणखी वाढतील,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.दर वाढल्यास निश्चितच सोयाबीन मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. अजय येंडे, सचिव, बाजार समिती
५० ते ६० टक्के घट खरिपाच्या सुरुवातीपासून पावसाने आजही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही.यंदा जिल्ह्यात २ लाख हेक्टर वरून अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती.त्यापैकी सुमारे १ लाखावर हेक्टरवरील क्षेत्राला जबर फटका बसला व त्यामुळेच सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.