आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:यु-डायसमध्ये नोंदवणार विद्यार्थ्यांची माहिती ; 30 नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे दिले आदेश

यवतमाळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२२-२३ च्या वर्षांकरिता यु-डायसची माहिती संकलित करण्यास सुरूवात झाली आहे. यंदा दोन टप्पे पाडण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शाळेची माहिती भरून घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांची इत्यंभूत ‘इन्फॉर्मेशन’ यु-डायसवर नोंदवण्यात येणार आहे. ही माहिती ३० नोव्हेंबर रोजी पर्यंत संकलित करावी, असे आदेश देण्यात आले आहे. चुकीची माहिती भरल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्याभरातील तीन हजार ३४४ शाळांची माहिती शासनाने विकसीत केलेल्या यु-डायसच्या प्रणालीमध्ये संकलित करण्यात येणार आहे. दोन वेगवेगळ्या टप्प्यात ही माहिती संकलित केल्या जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात शाळेचे ठिकाण, प्रकार, व्यवस्थापन, माध्यम, आरटीई, साहित्य उपक्रम, केपीआय, पीजीआय इंडिकेटर्स, शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च आदी माहिती भरावयाची आहे. दुसऱ्या भागात शालेय इमारत, वर्गखोली, शौचालय, पिण्याचे पाणी, संगणक आणि नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम तसेच तिसऱ्या भागात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व्यावसायीक प्रशिक्षण आदी माहिती संगणकीकृत केली जाणार आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थीनिहाय तपशिलवार माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, वर्ग जनरल रजिस्टर नंबर, जन्म दिनांक, जात, बीपीएल, दिव्यांगाचे प्रकार, आधार संबंधित माहिती, आरटीई प्रवेश सहाय्यभूत सुविधा आदींची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीपासून यु-डायसमध्ये माहिती भरण्यास संकलित करण्यास सुरूवात झाली आहे.

आता ३० नोव्हेंबर रोजी पर्यंत माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पर्यवेक्षीय यंत्रणेबाबत समग्र शिक्षाचे कनिष्ठ अभियंता, अकाऊंटंट, साधनव्यक्ती आदी जण उपस्थित होते. यामध्ये चुकीची माहिती भरल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार आहे.

ह्या माहितीच्या आधारावरच शाळा अनुदान जिल्ह्यातील तीन हजार ३४४ शाळांची नोंद गतवर्षी यु-डायसमध्ये घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सर्वशिक्षा कडून अनुदान वितरीत केल्या जाते. यात भौतिक सुविधांपासून गणवेश, आणि इतरही अनुदानाचा समावेश आहे. त्यामुळे ही माहिती चुकीची भरू नये, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...