आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण कृषी कार्यक्रम:करवंदापासून मुरब्बा बनवायचे मार्गदर्शन

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी जुव्हेरिया गोहर, समीक्षा भाले, समीक्षा होडगिर, ऋतुजा भोयर व ऋतीक राऊत यांनी शेतकरी महिला वर्ग यांना प्रत्यक्ष करवंदपासून मार्मालेड (मुरब्बा) कसे बनवायचे याचे मार्गदर्शन केले.

शेतात उत्पादित पिकांपासून अनेक पदार्थ बनवता येतात व पिकांपासून मिळणारा आपला नफा वाढवता येतो याबद्दल माहिती दिली. याचबरोबर आवळा, टोमॅटो, पपई, संत्रा इत्यादी पिकांची विक्री करण्यापेक्षा पिकाचे मूल्यवर्धित करुन विविध वस्तू आणि पदार्थ, ज्यूस यांची निर्मिती करुन आर्थिक उत्पन्न वाढवता येते. याबाबत महिलांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. याचबरोबर केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया योजनेबद्दल माहिती दिली.

प्रात्यक्षिक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू कार्यक्रम अधिकारी प्रा. सौरभ महानुर, विषय शिक्षिका दीपाली धोत्रे आणि ए. एस. ढेंगळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास भारी येथील मनीषा हुमने यांचे विशेष सहकार्य लाभले. गावातील इतर महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...