आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२२-२३ च्या खरीप हंगामा करीता लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख १५ हजार ८४८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. आणखी आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
शासनाने जुलै २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिली आहे. यात खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस आदी पिकांचा विमा काढता येणार आहे.
विशेष म्हणजे पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणी, लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गीक आपत्ती आदी बाबींचा समावेश राहणार आहे. यात कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी असे दोन घटक आहेत.
यंदा शेतकर्यांना ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे. मृगनक्षत्र लागल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्याला सुरूवात केली, परंतू समाधानकारक पावसा शिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. तर जून महिन्यात समाधानकारक पाऊस सुद्धा पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंबाने पेरण्या केल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७५ टक्क्याहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या.
तद्नंतर शेतकऱ्यांनी विमा उतरवण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख १५ हजार ८४८ शेतकर्यांनी विम्याचा अर्ज केला आहे. यात १७ हजार ३६३ बँक, ९८ हजार २९१ सीएससी सेंटर, तर १९४ शेतकऱ्यांनी स्वत:हून विमा काढला आहे. आता विमा काढण्याकरता ३० जुलै रोजी पर्यंत मुदत असून, आणखी आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.