आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे ठाणेदारांना निवेदन:गोळ्या मिश्रीत शिंदीची नशा; युवकांच्या आरोग्याची दुर्दशा

ढाणकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैराशाच्या गर्तेत सापडलेला युवक, गांजा, देशी, विदेशी व हातभट्टी सारख्या गोष्टींचे सेवन करून आपले आयुष्य नाश करत आहे. आता ढाणकीत गोळ्या मिश्रीत शिंदीने शिरकाव केला असून, अनेक तरुण शिंदीची नशा करताना दिसून येताहेत. अगदी कोवळ्या वयातली मुलेसुद्धा व्यसनाधिनकडे वळत असल्याने त्यांचे आयुष्य धोक्यात येत आहे. पैसे कमावण्याच्या उद्देशाने तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या परिसरातील शिंदी माफियांच्या मुसक्या आवळ्याची मागणी नागरिकांनी एका निवेदनाद्वारे ठाणेदार प्रताप भोस यांच्याकडे केली आहे.

कृष्णापूर, सोईट तसेच टेंभेश्वर नगरातील युवकांना शिंदी विक्रेत्यांनी लक्ष केले असून त्यामध्ये शाळकरी मुले देखील त्यांच्या गळाला लागली आहे. शिक्षणासाठी व इतर कामासाठी दिलेल्या पैशांचा दुरुपयोग नशेची लत भागविण्यासाठी हे तरूण वर्ग करत आहे. नशेच्या गोळ्यांनी अनेक तरुणांच्या आरोग्य व मानसिकतेवर दुरगामी परीणाम होत असून मनोरूग्णा सारखे विकार त्यांना झडत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याचे निवेदनात शेख तैयब शेख अहेमद, सैयद खालीद सैयद जिलाणी यांनी म्हटले आहे. ठाणेदार प्रताप भोस यांनी वेळीच शिंदी विक्रेत्यांना पायबंद आणि मुसक्या आवळल्या नाही तर ढाणकीच्या तरुणांची अख्खी पिढीच्या पिढीच बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही असेही निवेदनात नमुद केले आहे.टोळी सक्रीय : गणेश उत्साहाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात शिंदीचा साठा ढाणकी सारख्या शहरात पुरवण्यासाठी शिंदी विक्रेत्याची टोळी सक्रीय झाली आहे. ठाणेदार प्रताप भोस यांची शिंदी विक्रेत्यांवर बारकाईने नजर असून पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर असल्याचे बोलल्या जाते.

उमरखेडमधून होते आवक
शिंदी विक्रेता हा उमरखेडवरून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ढाणकीतील काही स्थानिक लोकांना हातात धरुन घातक शिंदी विक्री होत. ढाणकी व परिसरात त्याने आपले जाळे एवढे पसरवले आहे की एका दिवसात १० हजार रुपयांची शिंदी विक्री करतो आणि त्यामधून अमाप पैसा मिळवतो. पैसा कमावण्याच्या धुंदीत तो तरूण पिढीला बरबाद करण्याचा जणू काही विडाच उचललेला आहे.

बातम्या आणखी आहेत...