आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात यवतमाळ येथे ता. ९ मार्च रोजी महिला दिनानिमित्य ‘भारतीय स्त्रियांच्या उत्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जगदंबा अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवा योजना समिती व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ, अमराती यांच्या संयुक्त विद्य मानाने करण्यात आले होते. या कार्य शाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने झाली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शितल राठोड, आर. डी. आय. के. कॉलेज बडनेरा, अमरावती आणि अध्यक्ष राष्ट्रीय नारी सशक्तीकरण महाराष्ट्र राज्य व महिला सुरक्षा फाउंडेशनच्या सचिव डॉ. सारिका शहा होते.
याप्रसंगी सचिव डॉ. शितल वातीले, प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, विविध विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शितल राठोड यांनी भारतीय स्त्रियांसाठी जाचक असलेल्या पुर्वापार रिती, रुढी, परंपरा याविषयी विश्लेशन दिले. या सर्व रुढी, परंपरेच्या जोखडातून भारतीय स्त्रियांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु कोड बिल रद्द करुन स्त्रियांच्या हितासाठी विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, वारसा हक्क, घटस्पोटा संबंधी अधिकार, दत्तक कायदा, नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार आदी विविध स्त्रियांसाठी हितावह कायदे बनवून ते मंजुर करुन घेण्यासाठी केलेल्या अत्यंत कठोर संघर्शाबद्दलची विस्तृत माहीती दिली. डॉ. सारीका शहा यांनी विद्यार्थ्यांना आई, बहिण, मैत्रिण व समाजातील सर्व स्त्रियांचा सन्मान करण्याचे आव्हान व महिलांचे विविध क्षेत्रातील असलेले भरीव योगदानाचे कौतुक केले.
स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याविषयी कसे जागृत राहावे व प्रत्येकाने अवयव दान करणे गरजेचे आहे हे महत्व पटवून दिले. संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी समाजाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचे असलेले मोलाचे योगदान या बद्दल माहिती देताना स्त्रिशक्तीच्या उदाहरणासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दाखला दिला.प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये कार्यशाळेचा उद्देश व विषय यावर प्रकाश टाकला. त्यांनी पुरुष प्रदान समाजात स्त्रियांचे स्थान पक्के होण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे असे सांगितले.या कार्यशाळेकरीता जगदंबा अभियांत्रिकी, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ, सावित्री ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ व वाधवानी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. निता चौकडे, प्रा. डॉ. मेघा वसु, प्रा. वैष्णवी गिरी, प्रा. चंचल क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.