आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराची संयुक्त संसदीय समितीकडे अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक चौकात धरणे आंदोलन केले.केंद्र सरकारने जे पेरले तेच उगवले आहे.
दोन-पाच वर्षांत एखाद्या उद्योगपतीच्या संपत्तीत एवढी कशी वाढ होते, असा प्रश्न काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. ती कशी झाली? कोणाच्या पाठिंब्याने झाली, हे सगळा देश ओळखून आहे. त्यांनी केलेले आता समोर आले असून, त्यात समान्य माणसाच्या मेहनतीचे उत्पन्न बुडण्याची भीती वर्तवली जात आहे. अशा उद्योगपतींनाच आता विमानतळ, रेल्वे, खाणी, रस्ते, वीज केंद्रे दिली जात आहेत, ही बाब चांगली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत एखाद्या उद्योग समूहातील मोठा आर्थिक गैरकारभार समोर आलेला आहे.
या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जावेद अन्सारी, संजय ठाकरे, चंदू चौधरी, रमेश भिसनकर, अशोक भुतडा, विक्की राऊत, स्वाती येंडे, किरण मोघे, उषा दिवटे, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, मिनाक्षी सावळकर, रूपाली मसाळ, नंदू कुडमेथे, उमेश इंगळे, अरुण ठाकूर, किरण कुमरे, लाला तेलगोटे, पंडित कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.