आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ-धामणगाव मार्ग बंद:एसटी महामंडळाच्या अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचा चक्काजाम

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियमित येणाऱ्या एसटी बसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळ-धामणगाव मार्गावर चक्का जाम केला. शेवटी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन दिवसांत नियमित बस चालू न झाल्यास संपूर्ण ग्रामस्थ आंदोलनात उतरतील, असा इशारा नागरिकांनी दिला.

बाभूळगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावरील फाळेगावातील बहुतांश विद्यार्थी धामणगाव येथील शाळ, महाविद्यालयात शिक्षण घेतात. दैनंदिन एसटी बसने ये-जा करतात, परंतू मागिल काही दिवसांपासून शाळेच्या वेळेत एसटी बस येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता विलंब होत आहे. रोज साधारणत: दोन ते तीन तासिका बुडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, परंतू त्यांनी कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही. शेवटी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी फाळेगाव येथे चक्का जाम आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी नियमित एसटी बससाठी नारेबाजी केली. साधारणत: अर्धा ते पाऊणतास यवतमाळ-धामणगाव मार्ग बंद होता. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, गावातील काही नागरिकांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून चक्का जाम बाबत माहिती दिली. त्यांनी एसटी बसच्या वेळेचे नियोजन करू, असे आश्वासन दिले, परंतू येत्या दोन दिवसांत निर्धारित वेळेत एसटी बस चालू न झाल्यास संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...