आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात‎:ईश्वर देशमुख सैनिक शाळेत‎ एनसीसी दिवस उत्साहात‎

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वर देशमुख सैनिक शाळेत एनसीसी दिवस‎ सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक नितीन धनवंत‎ तर प्रमुख अतिथी म्हणून कमांडंट कर्नल आर. एन.‎ गोखले व नरेंद्र लाचुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक एनसीसी प्रभारी महेश अंदुरे यांनी‎ केले.एनसीसी कॅडेट कुणाल गुल्हाने यांनी एनसीसीची‎ माहिती दिली.

तर चिराग बेले याने एनसीसीचे देशाला‎ योगदान ह्या विषयावर वक्तव्य केले. शाळेचे‎ मुख्याध्यापक नितीन धनवंत यांनी शाळेच्या एनसीसी ची‎ ऐतिहासिक माहिती दिली. तर शाळेचे कमांडंट कर्नल‎ गोखले यांनी एनसीसीमध्ये शाळेची प्रगती आणि येणाऱ्या‎ दिवसातले मोठे बदल आणि घडामोडींवर भाष्य केले.‎ विद्यार्थ्याना एनसीसीचे फायदे सांगितले. त्यानंतर सर्व‎ ''अ'' सर्टिफिकेट मिळवणाऱ्या कॅडेट यांना सर्टिफिकेट‎ देण्यात आले. समारंभाचा सांगता कमांडंट यांनी एनसीसी‎ कॅडेट आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचे, एनडीए, टेकनिकल‎ एन्ट्री आणि अग्नी वीर भरतीवर वर्कशॉप घेऊन‎ मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...