आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या प्रकरण:जुन्या वादातून इसमाची निर्वस्त्र करून हत्या; लोही येथील घटना, 6 तासांत 4 मारेकरी जेरबंद

दारव्हा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून एका ३६ वर्षीय इसमाची निर्वस्त्र करत हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना दारव्हा तालुक्यातील लोही येथे मंगळवार, ५ एप्रिलला सकाळच्या सुमारास घडली असून, सहा तासात चार मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. रमेश विश्वनाथ राऊत वय ३६ रा. हातोला ता. दारव्हा असे मृतकाचे नाव आहे. तर गणेश वंजारी, विश्वास राऊत, वैभव दुरीक आणि नीलेश कटारे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहे.

दारव्हा तालुक्यातील हातोला येथील युवकांसोबत दोन वर्षांपूर्वी रमेश राऊतचा वाद झाला होता. त्यातून वारंवार त्यांचे खटके उडत होते. अशातच मंगळवारी गावातील युवक येथे दारू पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी जुन्या वादातून युवकांचा रमेशसोबत पुन्हा वाद निर्माण झाला व यातूनच सहकाऱ्यांच्या मदतीने रमेशला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान लोही गावालगत असलेल्या पाणंद रस्त्याला लागून निर्वस्त्र अवस्थेत त्याचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी रमेश राऊतच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि मांडीवर मुक्का मार असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दारव्हा पोलिसांनी तपास चक्रे फिरवून चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार सुरेश मस्के, पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी, दोडके, जमादार श्रावण दाढे, सुनील राठोड, सुरेश राठोड, रवी मोरलेवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...