आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसओ:डीएसओओची आयएसओ भरारी; जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर माहिती फलक

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासकीय कार्यालयात एखाद्या कागदपत्रांसाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाज आणि वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आयएसओ मानांकन प्राप्त पहिले कार्यालय ठरले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्रे, कोणाला भेटायचे याचे माहिती फलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी असल्यास नागरिकांना पुरवठा विभागाच्या संबंधित माहीतीसाठी टीव्ही संच लावलेला आहे. तसेच मॉडेल स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती केली आहे. भिंतीवर पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. कर्मचाऱ्‍यांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून, कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रारपेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावे व ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी व कर्मचारी अशा अनेक सुविधांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय लक्ष वेधून घेत आहे.

पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
कार्यालयाला आयएसओ नामांकन मिळवण्याठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदारांशी बैठक घेण्यात आले. तसेच कार्यालयात मॉडेल स्वस्त धान्य दुकान तयार करून जिल्ह्यात सात लाख शिधापत्रिका धारक, दोन हजार ४१ स्वस्त धान्य दुकाने व अठरा गोडावून यांच्या मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी

बातम्या आणखी आहेत...