आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरणाचा समतोल राखल्या जावा म्हणून निसर्गनिर्मित नद्या, तलाव व अन्य जलाशय, उद्याने, वृक्ष-वेल्ली आणि जंगल सुरक्षित ठेवत मानवी जीवनाचे अस्तित्व अबाधित ठेवणे ही काळाची गरज आहे. नववर्षाच्या प्रारंभ दिनी आपण सुरू केलेल्या चला जाणुया नदीला- वाघाडी नदीच्या सौंदर्यीकरणाला या महाश्रमदान मोहिमेला यवतमाळकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वाघाडी नदीच्या संवर्धनाची ही मोहीम आपण नक्कीच यशस्वी करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मानवी जीवन समृध्द राहावे यासाठी सभोवतालचे निसर्ग सौंदर्य देखील तितकेच समृध्द ठेवण्याची गरज आहे. आपल्या आजोबा-पणजोबांकडुन आपण नदी, ओहोळ, तलाव यासारख्या जलस्त्रोतांविषयी बरेच काही ऐकले असेल, परंतु आपल्याच चुकांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. आता आपल्या गाव, शहरातील कधीकाळी समृध्द असणारे जलाशय कमी होत आहे. त्यांचे पुनर्जीवन करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. म्हणुनच राज्य शासनाने नद्यांच्या विकासाची विशेष मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणाच्या बाबतीत सजग असलेल्या काही संघटना, नगर पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कामाला आता लोकचळवळीचे रुप आले आहे. परिवर्तनाचे हे चित्र इतरांना दिशा देईल,
चला जाणूया नदीला अभियानात या संघटनांनी नोंदवला सहभाग या महाश्रमदान अभियानात संकल्प फाउंडेशन, प्रयास, निस्वार्थ फाउंडेशन, काइंडली ब्लॉगर्स, जिल्हा होमगार्ड, रोटरी क्लब, रोटरी क्लब मिडटाउन, लायन्स क्लब, लायन्स क्लब फार्मा, इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल केमिस्ट अॅड ड्रगीस्ट, मिशन फॉर अव्हरनेस, आदित्य वाहीनी, रेडक्रॉस सोसायटी, जगजागृती समिती, ऑटोरिक्षा असो, यवतमाळ सायकलिंग क्लब, नारी रक्षा समिती, कंत्राटदार संघटना, असिस्टंट इंजिनिअर असोसिएशन, पेट्रोलपंप ओनर असोसिएशन, झुंबा क्लब, मोक्षधाम सेवा समिती, सेवा समर्पण प्रतिष्ठान, जस्टीस फॉर पीस अॅड मुव्हमेंट, पत्रकार संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, टीडीआरएफ. यवतमाळचा राजा मंडळ, अस्तित्व फाउंडेशन, कमलदेवी फाउंडेशन, शक्ती फाउंडेशन, जिल्हा पोलिस बॉईज ग्रुप, एमपीजे ग्रुप, योगनृत्य परिवार, महिला बचतगटे, वस्तिस्तर संघ, शहरस्तरीय संघ, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेलर्स, महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशन आदी संघटनांचा सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.