आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिर:जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला‎ ‘नॅक’ व्दारा ‘ए प्लस’ मानांकन‎

यवतमाळ‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी ‎ ‎ महाविद्यालयाला नुकतीच राष्ट्रीय ‎ ‎ मूल्यांकन आणि मान्यता परिषद‎ (नॅक) समितीने प्रत्यक्ष भेट दिली.‎ त्यानंतर राष्ट्रीय मूल्यांकन आणि‎ मान्यता परिषद बैंगलोरव्दारे दि. २० ‎ ‎ फेब्रुवारीला जाहिर करण्यात‎ आलेल्या निकालामध्ये‎ महाविद्यालयास ‘ए प्लस'' मानांकन‎ प्राप्त झाले. संत गाडगे बाबा‎ अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ‎ ‎ असलेल्या सर्व अभियांत्रिकी ‎ ‎ महाविद्यालयांपैकी जगदंबा‎ अभियांत्रिकी महाविद्यालय,‎ यवतमाळ हे राष्ट्रीय मूल्यांकन आणि ‎ ‎ मान्यता परिषद (नॅक) व्दारे ‘ए‎ प्लस’ मानांकन प्राप्त करणारे‎ एकमात्र महाविद्यालय ठरल्याने‎ संस्थेच्या शिरपेचात अजुन एक‎ मानाचा तुरा खोवला. लवकरच‎ नविन शैक्षणिक धोरणानुसार जगदंबा‎ अभियांत्रिकी महाविद्यालय स्वायत्त‎ (अॅटोनॉमस) महाविद्यालयांसाठी‎ आग्रही असनार असल्याचे प्रतिपादन‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ संस्थेचे सचिव डॉ. शीतल वातीले‎ यांनी केले.

या मानांकनाव्दारे‎ यवतमाळ सारख्या आदिवासी बहुल‎ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि‎ मान्यता परिषद (नॅक) व्दारे ‘ए‎ प्लस’ ग्रेड प्राप्त महाविद्यालयात उच्च‎ दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध‎ असल्याने अभियांत्रिकी‎ शिक्षणाकरीता बाहेर ठिकाणी जावे‎ ‎लागणार नाही व पालकांच्या‎ शिक्षणावरील होणाऱ्या अतिरिक्त‎ खर्चात कपात होईल असे संचालक‎ पवन वातीले यांनी सांगीतले. या‎ पत्रकार परिषदेकरिता आय.क्यू.ए.सी.‎ समन्वयक डॉ. विजय भांबेरे, विभाग‎ प्रमुख डॉ. विजय नेवे, प्रा. पराग‎ ठाकरे, प्रा. सागर राऊत, प्रा. धनश्री‎ पोहरे आदी उपस्थित होते.‎

नॅकचे मानांकन अत्यावश्यक‎ ‎नॅकचे मानांकन हे नुसतेच महत्वाचे नसून अत्यावश्यक‎ ‎ आहे कारण त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा दर्जा सुधारल्या‎ ‎ जातो. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात शिक्षणाला महत्व‎ ‎ असल्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढावी‎ ‎ तसेच विविध प्रक्रियांचे योग्य मूल्यमापन करण्याकरता‎ ‎ नॅक प्रोसेस महत्वाची आहे. डॉ. शीतल वातीले, सचिव‎

बातम्या आणखी आहेत...