आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारादरम्यान मृत्यू:यवतमाळच्या कारागृहातील कैद्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका कैद्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश रमेश जाधव (२७) रा. मध्यवर्ती कारागृह यवतमाळ असे मृत कैद्याचे नाव आहे.यवतमाळ मध्यवर्ती कारागृहातील कैदी आकाश जाधव याची २२ जुलैला अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी करण्यात आली असता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याच्यावर सतत पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी आकाश जाधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय अहवाल समोर आल्यावरच कळू शकेल, अशी माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...