आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात शहरातील जैन समाज बांधव आक्रमक

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन झारखंड सरकारच्या शिफारशीवरून केंद्रीय वन मंत्रालयाने झारखंडमधील गिरदीश जिल्ह्यातील मधुवन येथील जैन तीर्थ श्री सम्मेद शिखर ‘पारसनाथ पर्वतराज’ म्हणून घोषित केले. जैन समाजाच्या कोणत्याही हरकती किंवा सूचनेशिवाय अधिसूचना जारी करून पर्यटन स्थळाचा घेतलेला निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनाद्वारे केली.

सम्मेद शिखर हे २० जैन तीर्थंकर आणि अनेक संतांचे मोक्षस्थान आहे. पारसनाथ तीर्थराज हे इको सेन्सेटिव्ह झोन, पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे हॉटेल्स, मांसाहारी पदार्थांची विक्री आणि दारू विक्री केंद्र उघडले जातील. यातून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खुलेआम मांसाहार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जैन धर्माचा मूळ सिद्धांत असलेल्या अहिंसेचा अनादर होणार आहे. त्यामुळे जैन धर्मीयांमध्ये प्रचंड नाराजी असून सदर निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी अशोक रोहणे, विनोद महाजन, नंदकुमार बदनोरे, जिनेंद्र बंगाले, सचिन बन्नोरे, अमोल काळे, विजय काळे, कमलाकर हनमत्ते, रविंद्र काळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...